Sun, Apr 21, 2019 06:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मालागाडीच्या दोन डब्यांना आग; पश्चिम रेल्वे विस्कळीत

दोन डब्यांना आग; पश्चिम रेल्वे विस्कळीत

Published On: Nov 09 2018 9:51AM | Last Updated: Nov 09 2018 1:10PMडहाणू : पुढारी ऑनलाईन 

वाणगाव बोईसर दरम्यान वानगाव लगतच्या पळे दांडीपाडा येथे मालगाडीच्या डब्यात प्लास्टिकचे ग्रेनील ने अचानक आग धारण केल्याने तब्बल दोन डबे आगीच्या भक्ष स्थानी गेल्याचा घटना  गुरुवारी रात्री ११.३० च्या दरम्यान घडली. या प्रकारानंतर वेळीच आग आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आल्याने पुढिल नुकसान टळले. या आगीमुळे ओव्हरहेड वायर आणि रुळाचे नुकसान झाल्याने डहाणू- विरार मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

त्यामुळे भाऊबीजेसाठी जाणाऱ्या  रेल्वे प्रवासी तोच व्यापाऱ्यांचा चांगलाच खोळंबा झाला आहे. तर चाकरमान्यांचा दिवस बुडाला. गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या अजूनही खोळंबल्या आहेत. ओवरहेड वायर आणि रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. तर मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक संथगतीने सुरू आहे.

मुंबई कडे जाणाऱ्या (अहमदाबाद पॅसेंजर, डहाणू - अंधेरी मेमु शटल,वलसाड पॅसेंजर,सुरत विरार शटल,डहाणू- पनवेल मेमु ,बोईसर दिवा मेमु)डहाणू कडे जाणाऱ्या (अहमदाबाद पॅसेंजर,विरार डहाणू मेमु,वलसाड पॅसेंजर ) या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.

आगीनं रौद्ररुप केले धारण

ओव्हरहेड वायर तुटून तेल असलेल्या डब्यांना आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. डब्यात प्लास्टिकचे ग्रेनील असल्याने आग झपाट्याने पसरत गेली. अथक प्रयत्न करत अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं. यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण, ओव्हरहेड वायर आणि रुळाचे नुकसान झाले आहे. यामुळे डहाणू- विरार मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.