Tue, Jan 22, 2019 08:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सर्पमित्राने पकडलेल्या नागिणीने दिली २४ अंडी 

सर्पमित्राने पकडलेल्या नागिणीने दिली २४ अंडी 

Published On: Apr 16 2018 6:04PM | Last Updated: Apr 16 2018 6:04PMकल्याणः वार्ताहर 

कल्याण पश्चिमेकडील उंबर्डे परिसरातील श्री कॉम्प्लेक्स येथील एका इमारतीत नागीण फिरत असल्याची माहिती सर्प मित्र दत्ता बोबे यांना मिळाली होती. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तत्काळ त्या ठिकाणी जाऊन नागिणीला मोठ्या शर्थीने पकडले. 

पकडलेल्या नागिणीला त्यांनी पालिकेच्या अग्निशमन दलाच्या आवारात ठेवले होते. आज (सोमवार दि.16) सकाळी ते नागिणीला मुरबाडच्या जंगलात सोडून देणार होते. सकाळी नागिणीला जंगलात सोडायचे म्हणून ते नागिणीला पकडण्यासाठी गेले असता त्यांना नागिणीने चोवीस अंडी दिल्याचे दिसून आले. 

नागिणीने अंडी दिल्याने ती आजुबाजूला कोणालाही फिरकू देत नव्हती. त्यामुळे पुन्हा तिला पकडण्यासाठी सर्पमित्रांना चांगलीच कसरत करावी लागली. नागिणीला पकडून त्यांनी मुरबाडच्या जंगलात सोडून दिले तर अंडी वन विभागाच्या ताब्यात दिली.

Tags : female snake, deliver, 24 egg, Mumbai news