Sat, Aug 24, 2019 10:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईच्या त्रिभाजनावरून विधानसभेत गदारोळ; सभागृह तहकूब

मुंबईच्या त्रिभाजनावरून विधानसभेत गदारोळ; सभागृह तहकूब

Published On: Dec 19 2017 1:58PM | Last Updated: Dec 19 2017 1:58PM

बुकमार्क करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी 

साकीनाका येथील आगीच्या दुर्घटनेच्या मुद्यावर बोलताना काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांनी मुंबईते त्रिभाजन करण्याची मागणी केली. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर विधानसभेत एकच गदारोळ उडाला. 

हा मुंबईचे तुकडे पाडण्याचा प्रयत्न असून ते सहन करणार नाही, असे आशिष शेलार यांनी सुनावले. त्यावर अजित पवार यांनी मुंबईचे तुकडे पाडण्याचा कोणताही विषय नाही. मंबईकरांच्या सुविधेचा विषय असताना शेलार या विषयाला वेगळे वळण देत असल्याचा आरोप केला. त्यानंतर शिवसेना आमदार सुभाष साबणे यांनी नसीम खान यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केल्याने एकच गदारोळ उडाला. परिणामी कामकाज दहा मिनिटे तहकूब झाले. 

कामकाज सुरू झाल्यावर नसीम खान यांनी आपण विभाजनाची मागणी केली नसून मुंबईची वाढती लोकसंख्या पहाता दिल्लीप्रमाणे तीन आयुक्तालये करण्याची मागणी केल्याचे सांगितले. मात्र, भाजप, सेनेच्या आमदारांनी सभापतींजवळ येत जोरदार घोषणाबाजी केली.