Mon, Sep 16, 2019 12:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › काँग्रेसचे आज एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

काँग्रेसचे आज एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

Published On: Apr 09 2018 7:42AM | Last Updated: Apr 09 2018 7:42AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

देशात शांती आणि सलोखा धोक्‍यात आल्‍याच्या निषेधार्थ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज दिल्‍लीतील राजपथावर उपोषणाला बसणार आहेत. सकाळी दहा वाजल्‍यापासून त्‍यांच्या उपोषणाला सुरुवात होणार आहे. तर, काँग्रेसतर्फे राज्‍यभरातील सर्व जिल्‍हा मुख्यालयासमोर एक दिवस उपोषण करण्यात येणार असल्‍याची माहिती प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. 

अशोक चव्हाण यांनी आपल्‍या ट्विटर अकाउंट वरून याबाबत माहिती दिली आहे. ‘‘भाजप सरकारच्या द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे. शांतता व सलोखा कायम राखण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे उद्या दि. ९ एप्रिल रोजी  राज्यभरातील सर्व जिल्हा मुख्यालयी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. मी स्वत: परभणी येथे  उपोषणाला बसणार आहे.’’ असे ट्विट अशोक चच्हाण यांनी केले आहे. 

प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण परभणी येथे उपोषणाला बसणार आहेत. मुंबईत सकाळी ११ वाजल्‍यापासून अमर जवान ज्योत जवळ पक्षातर्फे सामूहिक उपवास कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली आहे.

जातीय सलोखा व सामाजिक ऐक्यासाठी आज सकाळी ११ वाजल्‍यापासून अमर जवान ज्योत जवळ, महापालिका मुख्यालयासमोर, सामूहिक उपवास कार्यक्रमाचे मुंबई काँग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संजय निरूपम यांनी दिली. 

Tags : congress president rahul gandhi, hunger strike, ashok chvhan