Mon, Dec 09, 2019 11:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › #MaharashtraFloods; मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना! 

#MaharashtraFloods; मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना! 

Published On: Aug 13 2019 5:00PM | Last Updated: Aug 13 2019 5:00PM

विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी १ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुर्पूद केला.मुंबई : पुढारी ऑनलाईन

सांगली, कोल्हापूर, साताऱ्यासह इतर जिल्ह्यात आलेल्या पूरामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार उद्वस्त झाले आहेत. आता पूरग्रस्तांना राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कॅबिनेटमधील सर्व मंत्री आपला एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना देणार आहेत. हा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन ते पूरग्रस्तांना मदत करणार आहेत. याबाबतची माहिती स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करून दिली आहे. 

औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाख रुपये दिले आहेत. विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनीही १ लाख रुपयांची मदत दिली आहे. या रकमेचा धनादेश त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुर्पूद केला. 

राज्य सरकारने पूरग्रस्त भागांसाठी केंद्र सरकारकडे ६ हजार कोटींच्या मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवून निधी देण्याची विनंती केली आहे. याबाबतचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.