Wed, Jul 24, 2019 14:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मध्य रेल्वेची वाहतूक विस्‍कळीत, चाकरमान्यांचे हाल

मध्य रेल्वेची वाहतूक विस्‍कळीत, चाकरमान्यांचे हाल

Published On: Jun 19 2019 8:53AM | Last Updated: Jun 19 2019 8:50AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

मध्य रेल्वेची वाहतूक विस्‍कळीत झाली आहे. डाऊन दिशेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्‍यामुळे मुंबईकडे येणाऱ्या गाड्या किमान २० मिनिटे उशिराने धावत आहेत. नेरळजवळ दुरंतो एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने लोकलची वाहतूकही विस्कळीत झाली आहे.

अंबरनाथकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरू आहे, परंतु, बदलापूरच्या पुढे हा बिघाड असल्याने सीएसटीकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. 

सकाळी-सकाळीच वाहतूक विस्‍कळीत झाल्‍याने सकाळच्या शिप्टमधील चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले आहेत.