Mon, Jun 17, 2019 11:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad ›  ..तर अमिताभ बच्चनजी तुमचा महानायकाचा बुरखा नक्की फाटेल!

 ..तर अमिताभ बच्चनजी तुमचा महानायकाचा बुरखा नक्की फाटेल!

Published On: Oct 12 2018 10:19PM | Last Updated: Oct 12 2018 10:19PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

#MeToo चे चक्रीवादळ बॉलिवुड महानायक अमिताभ बच्चन यांच्यावरही येऊन धडकले आहे. अमिताभ बच्चन यांच्यावर बॉलिवुड हेअर स्टायलिस्ट सपना मोती भावनानीने ट्विटरवरून अत्यंत गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. 

त्यामुळे #MeToo च्या वादळामध्ये अमिताभ यांच्यावरही बालंट आल्याने बॉलिवुडमध्ये भुवया उंचावणार आहेत यामध्ये शंका नाही. तुम्ही लैंगिक गैरवर्तन केलेल्या अनेक कथा मी व्यक्तिगरित्या ऐकल्या आहेत, मला आशा आहे की, त्या महिलांनी समोर येण्याची गरज आहे, त्यांच्या (अमिताभ बच्चन यांच्या) दांभिकतेचा खुप कंटाळा आलेला आहे.

भावनानीने अमिताभ यांच्यावर निशाणा साधणारी ट्विट रिट्विट करून राळ उडवून दिली आहे. महानायक बच्चन यांच्यावर पिंक चित्रपटातील भूमिकेवरून टीका केली आहे. या चित्रपटानंतर तुमची कार्यकर्ता म्हणूनच प्रतिमा सादर करण्यात आली. अमिताभ बच्चन यांनी महिलांनी अन्याय सहन करता कामा नये त्यांनी वाच्यता केली पाहिजे, अशी भूमिका काल त्यांनी वाढदिनी ट्विटरवरून मांडली होती. 

तत्पूर्वी, त्यांनी नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार देताना माझे नाव नाना किंवा तनुश्री नाही असे खोचकपणे म्हटले होते. भवनानीने काल बच्चन यांनी केलेल्या ट्विटवरून कडाडून प्रहार केला आहे. तुम्ही केलेले ट्विट खोटारडे असून तुम्ही जी काही वर्तणुक केली आहे ती आठवून नखं कुरतडू नका, तुमचे सत्य बाहेर येईल आणि तुम्हालाही किंमत चुकवावी लागेल अशा शब्दात तिने प्रहार केला आहे.