Mon, Dec 09, 2019 18:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शूटिंगदरम्‍यान अभिनेत्री माही गिलसह कलाकारांना मारहाण, ७ जणांना अटक (Video)

शूटिंगदरम्‍यान अभिनेत्री माही गिलसह कलाकारांना मारहाण, ७ जणांना अटक (Video)

Published On: Jun 20 2019 9:07AM | Last Updated: Jun 20 2019 9:08AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

‘फिक्सर’ या वेबसीरिजच्या शूटिंग दरम्‍यान अभिनेत्री माही गिलसह कलाकारांना अज्ञात हल्‍लेखोरांनी रॉडने मारहाण केली. मीरा रोड या ठिकाणी शूटिंग सुरू असताना ही घटना घडली. निर्माते साकेत सावनी आणि माही गिल यांचा एक व्हिडिओ दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर करत या घटनेबाबतची माहिती दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे. 

बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. साकेत सावनी यांनाही या हल्‍ल्‍यात दुखापत झाली आहे. हल्‍ल्‍यावेळी पोलिसांनी गुंडाची साथ दिल्याचा आरोप माही गिलने केला आहे.

तिग्मांशू धुलिया यांनी शेअर केलेल्‍या व्हिडिओमध्ये साकेत सातव यांनी म्‍हटले आहे की, ‘‘मीरा रोड येथे शूटिंग करण्यासाठी आम्ही लोकेशन मॅनेजरला पैसे दिले होते. तसेच या ठिकाणी शूटिंग करण्यासाठी आम्ही सर्व परवानग्या काढल्या आहेत. तरीही संध्याकाळी चार ते साडेचारच्या दरम्यान दारू प्यायलेले काही लोक सेटवर आले. त्यांनी या शूटिंगसाठी आम्हाला का विचारले नाही, असे म्हणत आम्हाला आणि सेटवरच्या इतरांनाही काठ्यांनी आणि रॉडने मारहाण केली.’’

माही गिलने या व्हिडिओत म्हटले आहे की, ‘‘शूटिंग सुरू असताना अज्ञात गुंडांनी कलाकारांना आणि इतर कर्मचाऱ्यांना मारहाण केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर मलाही मारहाण केली. त्‍यांनी आमचे काहीही ऐकून न घेताच आमच्या दिग्दर्शकाला, डीओपीला, कलाकारांना सगळ्यांना या मारहाण केली. एखाद्या जनावराला मारतात त्याप्रमाणे आम्‍हाला मारहाण करण्यात आली, असा प्रकार मी पहिल्यांदा पाहिला आहे.