होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ज्येष्ठ रंगकर्मी अरूण काकडे यांचे निधन  

ज्येष्ठ रंगकर्मी अरूण काकडे यांचे निधन  

Last Updated: Oct 09 2019 7:26PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

ज्येष्ठ रंगकर्मी अरूण काकडे यांचे निधन झाले. ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरूण काकडे यांनी ६० वर्षांहून अधिक काळ रंगभूमीवर कार्यरत होते. ९४ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्षही होते. त्यांचं अमका हे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे. 

अरुण काकडेंनी रंगभूमीवर आपली वाटचाल पुण्यातून सुरू केली. त्याकाळात विजया मेहता, विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे या दिग्गज रंगकर्मींसोबत त्यांनी काम करत रंगायन ही नाट्यसंस्था सुरू केली. दादरच्या छबिलदास शाळेत ही संस्था सुरू होती. त्यावेळी या संस्थेतर्फे विविध विषयांवरील नाटकं सादर केली जात होती. या नाट्यसंस्थेत पुढे वाद उद्भवले आणि अरुण काकडे यांनी अरविंद देशपांडे आणि विजया मेहता यांच्यासोबत १९७१ रोजी आविष्कार ही नवीन नाट्यसंस्था सुरू केली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

भावपूर्ण श्रद्धांजली : ज्येष्ठ रंगकर्मी अरूण काकडे यांचे निधन ज्येष्ठ रंगकर्मी अरूण काकडे यांचे निधन झाले. ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरूण काकडे यांनी ६० वर्षांहून अधिक काळ रंगभूमीवर कार्यरत होते. ९४ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्षही होते. त्यांचं अमका हे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे. अरुण काकडेंनी रंगभूमीवर आपली वाटचाल पुण्यातून सुरू केली. त्याकाळात विजया मेहता, विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे या दिग्गज रंगकर्मींसोबत त्यांनी काम करत रंगायन ही नाट्यसंस्था सुरू केली. दादरच्या छबिलदास शाळेत ही संस्था सुरू होती. त्यावेळी या संस्थेतर्फे विविध विषयांवरील नाटकं सादर केली जात होती. या नाट्यसंस्थेत पुढे वाद उद्भवले आणि अरुण काकडे यांनी अरविंद देशपांडे आणि विजया मेहता यांच्यासोबत १९७१ रोजी आविष्कार ही नवीन नाट्यसंस्था सुरू केली. काकडे यांना संगीत नाटक अकादमी, ध्यास-सन्मान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. प्रायोगिक रंगभूमीचा आधारवड हरपला, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. #theatre #theataris #dramatics #indiandrama #drama #pudhari #pudharionline #webpudhari #pudhariweb #dailypudhari @pudharionline@sanghavi_official @

A post shared by Pudhari (@pudharionline) on Oct 9, 2019 at 5:23am PDT

काकडे यांना संगीत नाटक अकादमी, ध्यास-सन्मान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

प्रायोगिक रंगभूमीचा आधारवड हरपला, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.  

नाट्य व्यवस्थापनामध्ये त्यांनी क्रांती केली. प्रायोगिक नाटकांसाठीचे त्यांचे योगदान खूप मोठे आहे. प्रायोगिक नाटकांची निर्मिती करणे अवघड होत असताना त्या काळात त्यांनी त्यासंदर्भात केलेले काम महत्वाचे आहे. अशा शब्दात ज्येष्ठ नाटककार विद्यासागर अध्यापक यांनी त्यांना आदरांजली वाहिली.