होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'रेशमी किड्याला आयुष्यातील ‘उपहास’ कधीच समजणार नाही'

'रेशमी किड्याला आयुष्यातील ‘उपहास’ कधीच समजणार नाही'

Last Updated: Feb 26 2020 3:30PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी केलेल्या जहाल आणि विखारी वक्तव्यावरून शिवसेनेवर निशाणा साधताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेने बांगड्या भरल्या असल्या, तरी आम्ही नाही. असे वक्तव्य केले होते. फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत माफीची मागणी केली. यानंतर या वादात अमृता फडणवीस यांनी उडी घेतली आहे. रेशमी किड्याला आयुष्यातील ‘उपहास’ समजणार नाही, अशा शब्दात अमृता यांनी आदित्य ठाकरेंना ट्विट करत सुनावले. 

अधिक वाचा : फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्यावर आदित्य ठाकरे म्हणतात मी सहसा प्रत्युत्तर देत नाही, पण..

रेशमी किड्याला आयुष्यातील ‘उपहास’ कधीच समजणार नाही, कारण पूर्वजांनी विणलेल्या सुखासीन ‘रेशमी’ आयुष्याचा उपभोग घेतच त्यांची भरभराट होते. देवेंद्र फडणवीसजी, तुमच्या संघर्षाचा आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचा अभिमान वाटतो, अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंच्या ट्विटला रिट्विट केले. अमृता यांच्या या ट्विटमुळे या वादाला नवे वळण लागण्याची शक्यता आहे. 

अधिक वाचा : स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून अजित पवार म्हणाले..

काय घडले होते नेमके

एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी केलेल्या जहाल आणि विखारी वक्तव्यावरून शिवसेना शांत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने बांगड्या भरल्या असतील, पण भाजपने भरलेल्या नाहीत आणि आम्हाला अशा वक्तव्यांना जशास तसे प्रत्युत्तर कसे द्यायचे याची माहिती असल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते. 

अधिक वाचा : 'अमित शहांनी माफी मागितल्यास निम्म्या अडचणी कमी होतील'

फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी समाचार घेतला. फडणवीस यांनी केलेले वक्तव्य अशोभनीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, सहसा मी उलट प्रतिक्रिया देत नाही, त्यामुळे  बांगड्या भरण्याच्या वक्तव्यावरून त्यांनी माफी मागितली पाहिजे. सर्व सक्षम महिलांकडून बांगड्या भरल्या जातात. राजकारण चालत राहिल, पण आपल्याला अशा प्रकारची भाषा बदलायला हवी, असे त्यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली होती. 

अधिक वाचा : मीरा भाईंदरच्या महापौरपदी भाजपच्या ज्योत्स्ना हसनाळे यांची निवड