Sat, Jan 18, 2020 03:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अमृता फडणवीस अन् प्रियांका चतुर्वेदी यांच्यात ट्विटर वॉर

अमृता फडणवीस अन् प्रियांका चतुर्वेदी यांच्यात ट्विटर वॉर

Last Updated: Dec 09 2019 10:22AM

अमृता फडणवीस व प्रियांका चतुर्वेदीमुंबई : पुढारी ऑनलाईन 

विधानसभा निवडणुकीनंतर भाजप-शिवसेना यांच्यातील मतभेद टोकाला गेल्याचे पाहायला मिळाले. आता झाडांच्या कत्तलीवरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांच्यात ट्विटरवर शाब्दिक चकमक झाल्याची पाहायला मिळाली. दलाली मिळाल्यानंतर शिवसेना वृक्षतोड करते, असा आरोप अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला. त्यानंतर प्रियांका चतुर्वेदी यांनी त्यांना प्रत्युत्तर देताना हे भाजपचे नवे धोरणे असावे, असा टोमणा मारला आहे. 

'दांभिकपणा हा रोग आहे. जेव्हा तुम्हाला कमिशन मिळते, तेव्हा तुम्हाला झाडे तोडलेली चालतात. या पापाला क्षमा नाही. गेट वेल सून शिवसेना,' असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले होते. या ट्विटसोबत अमृता फडणवीस यांनी एका वृत्तपत्राची बातमीही शेअर केली होती. त्यामुळे शिवसेनेच्या वृक्षप्रेमावर सोशल मीडियातून टीकाही सुरू झाली होती.

अमृता फडणवीस यांच्‍या ट्विटला प्रियांका चतुर्वेदी यांनी ट्विटरच्याच माध्यमातून उत्तर दिले आहे. 'सॉरी, तुमची थोडी निराशाच होईल. पण एकही झाड कापले जाणार नाही, हे सत्य आहे. महापौरांनीही याला दुजोरा दिला आहे. रेटून खोटे बोलणे हा मोठा रोग आहे. गेट वेल सून,' असा टोला प्रियांका यांनी अमृता फडणवीस यांना लगावला आहे.

अमृता फडणवीस प्रियांका चतुर्वेदी यांच्यात ट्विटर वॉर