Fri, Sep 20, 2019 21:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ...म्हणून शहांनी घेतली माधुरीची भेट (Video)

...म्हणून शहांनी घेतली माधुरीची भेट (Video)

Published On: Jun 06 2018 1:57PM | Last Updated: Jun 06 2018 2:12PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

भाजपच्या पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपने संपर्क मोहिम वाढवण्यास सुरुवात केली आहे.  यासाठीच भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबई दौऱ्याची आखणी केली. या दौऱ्यात शहांच्या मातोश्रीवर उध्दव ठाकरेंच्या भेटीचीच चर्चा जास्त झाली परंतु या दौऱ्यात शहा अभिनेत्री माधुरी दिक्षितची देखील भेट नियोजित होती. पण, ही भेट का घेणार हे गुलदस्त्यात होते. 

अमित शहा मुंबई विमानतळावरून भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरी गेले. त्यानंतर ते थेट माधुरीच्या घरी गेले. मुंबई दौऱ्यात शहा-माधुरी भेटीची चर्चा रंगली होती. या दोघांच्या भेटीनंतर या भेटीचे रहस्य उघड झाले आहे. २०१९ निवडणुकीच्या पार्शवभूमीवर भाजप सरकारने गेल्या चार वर्षात केलेली कामे लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी एक विशेष कॅम्पेनची तयारी करत आहे. त्यासाठी लोकप्रिय कलाकारांच्या मदतीने जनतेपर्यंत कामे पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहे असे समोर आले. मात्र या भेटीची राजकीय वर्तृळात वेगळी चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. भाजप  माधुरीला राज्यसभेची ऑफर देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.     

अमित शहा माधुरीची भेट घेऊन लता मंगेशकर या अजुन एक मोठ्या कलाकाराची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर ते विश्रांती घेऊन उद्योगपती रतन टाटा यांना भेटणार आहेत. त्यानंतर ते मातोश्रीवर जाणार आहेत.