होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एअर इंडियाचं विमान संरक्षक भिंतीला धडकलं 

एअर इंडियाचं विमान संरक्षक भिंतीला धडकलं 

Published On: Oct 12 2018 10:06AM | Last Updated: Oct 12 2018 10:06AM



मुंबई : पुढारी ऑनलाईन

एअर इंडियाच्या विमानाचा गुरुवारी रात्री त्रिची विमानतळावर अपघात झाला. सुदैवाने यावेळी मोठा अनर्थ टळला. प्राथमिक माहितीनुसार, त्रिची विमानतळावरील एटीसीच्या संरक्षक भिंतीला हे विमान धडकले. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. सुदैवाने विमानातील सर्व १३० प्रवासी सुखरूप आहेत. 

दरम्यान, तांत्रिक कारणामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली असून याप्रकरणी डीजीसीएने चौकशीचे आदेश दिले आहेत. अपघातानंतर वैमानिकाने पहाटे ५ वाजता मुंबई विमानतळावर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग केले. 

 अपघातानंतर सर्व प्रवासी घाबरले होते. सर्व प्रवाशांना मुंबई विमानतळावर थांबवण्यात आले आहे. त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्थेची सोय केली जात आहे. अपघातानंतर मंत्री नटराजन यांनी विमानतळाला भेट देत दुर्घटनेची माहिती घेतली.