Sun, Jul 05, 2020 13:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हत्तीणीच्या मृत्यूनंतर बॉलिवूडकर संतापले

हत्तीणीच्या मृत्यूनंतर बॉलिवूडकर संतापले

Last Updated: Jun 04 2020 12:27PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

केरळ राज्यातील एक गर्भवती हत्तीणीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर बॉलिवूड सेलेब्रिटी आणि देशभरातील लोक स्तब्ध झाले आहेत. कारण, त्या हत्तीणीला फटाक्यांनी भरलेला अननस खाऊ घातला होता, ज्यामुळ फटाके फुटून तिचा जबडा पूर्णपणे फाटला. जखमी अवस्थेत ती आपल्या पोटातील बाळाला वाचवण्यासाठी कशी बशी जिवंत राहिली होती. या घटनेनंतर खूप वेळ पाण्यात उभी होती आणि वेदना सहन करत करत तिने आपले प्राण सोडले. या अमानवीय, अमानुष, क्रूर कृत्य करणाऱ्यांवर कारवाई होण्याची मागणी आता होऊ लागली आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनेही ट्विट करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

उत्तर केरळच्या मलप्पुरममध्ये राहणाऱ्या एका वनअधिकाऱ्याने सोशल मीडियावर या घटनेची माहिती दिली आहे. या घटनेनंतर रतन टाटा, श्रद्धा कपूर, अनुष्का शर्मा, मलायका अरोरा यांच्याहून अधिक बॉलिवूड सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला. अक्षय कुमारने दोषींविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर रतन टाटा यांनीही ट्विट करून तिला न्याय मिळावा, असे म्हटले आहे.  

अक्षय कुमारने गर्भवती हत्तीणीच्या मृत्यवर नाराजी व्यक्त करत ट्विट केलं आहे की, 'त्या हत्तीणीसोबत जे काही झालं ते मन हेलावणारे आहे, अमानवीय आणि अस्वीकार्य आहे! दोषींविरोधात कडक कारवाई व्हायला हवी. प्रत्येकाच आयुष्य महत्त्वाचं आहे.' 

दरम्यान, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हत्तीणीच्या मृत्यूसंदर्भात म्हटले आहे की, 'याप्रकरणी केंद्र सरकार खूप गंभीर आहे आणि दोषीवर कारवाई केली जाईल.' भुकेने व्याकूळ होऊन हत्तीणी जंगलाच्या बाहेर येऊन गावात आली. तिला तेथील काही लोकांनी फटाक्यांनी भरलेले अननस खाऊ घातले होते. त्यामुळे हत्तीणीच्या तोंडात फटाके फुटल्याने तिचा मृत्यू झाला.