Sat, Aug 24, 2019 09:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाड : नशीब बलवत्तर म्हणून वरध घाटात एसटीचा मोठा अपघात टळला 

नशीब बलवत्तर म्हणून एसटीचा अपघात टळला 

Published On: Nov 08 2018 3:07PM | Last Updated: Nov 08 2018 8:34PMरायगड : पुढारी ऑनलाईन 

भोर आगारातून महाडकडे सकाळी ८ वाजता निघालेलया पुणे महाड गाडीला महाड  हद्दीत वाघजाई घाटांमध्ये सुदैवाने मोठा अपघात चालकाच्या प्रसंगावधानाने टळला. वळणावर गाडीचा ताबा राखण्यात चालकाला यश आल्याने गाडीतून प्रवास करणारे सुमारे साठ प्रवासी सुखरुप बचावल्याची प्राथमिक माहिती महाड आगारातून देण्यात आली आहे. 

प्राथमिक माहितीनुसार सकाळी आठ वाजता भोर आगातून ही गाडी महाड दिशेने रवाना झाली होती. बाराच्या सुमारास वाघजाई घाटामधे वरिल ठिकाणावर आली असताना  वाघजाई मंदिरापासून च्या महाडहद्दीतील दुसऱ्या वळणावर आली असता गाडीत झालेल्या तांत्रिक बिघाडाने चालकाला तातडीने ब्रेक लावणे क्रमप्राप्त झाले. या गाडीतून प्रवास करणारे सगळे प्रवासी सुखरूप असून त्यांना दुसऱ्या गाडीने महाडच्या दिशेने रवाना करण्यात आल्याची माहिती महाडाचे

आगार अधिकारी श्री शिवाजी जाधव यांनी दिली आहे .

या संदर्भात महाड आगर व्यवस्थापक श्री. कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार या गाडीचे चालक मोहन उत्तम बांदल हे गाडी चालवत होते तर या गाडीमधून ७२ प्रवासी प्रवास करीत होते. महाड आगारातून बदली गाडीने सर्व प्रवाशांना महाड येथे आणण्यात आल्याची माहिती त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे बोलताना दिली.