Sun, Oct 20, 2019 06:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उल्हासनगरमधील पाच मजली इमारत कोसळली (video)

उल्हासनगरमधील पाच मजली इमारत कोसळली (video)

Published On: Aug 13 2019 2:26PM | Last Updated: Aug 13 2019 2:26PM

उल्हासनगर येथील कोसळलेली पाच मजली इमारत.उल्हासनगर : प्रतिनिधी

उल्हासनगर कॅम्प २ मधील महक ही पाच मजली इमारत सकाळी कोसळली. ह्या इमारतीत ३१ कुटुंबे राहत होती. 

रविवारी सकाळी इमारतीतील १० सदनिकांचे दरवाजे उघडत नसल्याने अग्निशामक दलाला बोलाविण्यात आले होते. त्यानंतर पालिका प्रशासनाने तात्काळ इमारत खाली केली होती. मात्र, सदनिकाधारकांना त्यांच्या मौल्यवान वस्तू काढण्यासाठी वेळ देण्यात आली होती. रविवारी सकाळी ह्या इमारतीचे दोन पिलर फाटल्यामुळे आजूबाजूच्या इमारती खाली करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. सकाळी ९ वाजता इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. 

दुर्घटनेनंतर पालिका आयुक्त सुधाकर देशमुख, साहाय्यक पोलिस आयुक्त धुला टेळे, सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, भगवान कुमावत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांनी घटनास्थळी पोहोचून प्रशासनाला आदेश दिले.