Sat, Jul 04, 2020 10:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अकरावी प्रवेशाचे संकेतस्थळ सुरू

अकरावी प्रवेशाचे संकेतस्थळ सुरू

Last Updated: Jul 01 2020 1:53AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेसाठी कनिष्ठ महाविद्यालयातील उपलब्ध जागा, विषय बदल, वाढीव तुकडी आदी माहितीसंदर्भात बदल करण्यासाठी 1 जुलैपासून संकेतस्थळ सुरू होत आहे. एमएमआर क्षेत्रात असलेल्या महाविद्यालयांना नोंदणी करता येणार आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रिया राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, नागपूर, अमरावती, नाशिक व औरंगाबाद महानगरपालिका हद्दीत राबविण्यात येते. मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहेत. त्यामुळे यंदा नव्याने मंजुरी मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे. महाविद्यालयीन जागा, अन्य माहिती भरावी असे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केले आहे.

गेल्या 2019-20 शैक्षणिक वर्षामध्ये अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे रजिस्ट्रेशन करण्यात आलेले होते. मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या अकरावी ऑनलाईन प्रवेशांचे लॉगिन आयडी व पासवर्ड 2019-20 मध्ये रजिस्ट्रेशन केलेल्या माहितीतील आपल्या रजिस्टर्ड मोबाईलवर 1 जुलै 2020 पासून पाठवण्यात येतील. त्या लॉगिन, पासवर्डच्या सहाय्याने 2020-21 या वर्षाच्या अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या माहितीमध्ये काही बदल असल्यास तो अकरावी ऑनलाईनच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन करावा, अशी माहिती शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी दिली.

शाळांना ऑनलाईन प्रशिक्षण

कोविड-19 प्रादुर्भाव लक्षात घेऊन यंदा शाळा व महाविद्यालयांना विभागनिहाय ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठीची लिंकही विभागाने दिली आहे. ाशशीं. सेेसश्रश.लेा गुगल लिंकद्वारे 
प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

दुसरा टप्पा विद्यार्थी नोंदणी...

महाविद्यालय नोंदणी झाल्यानंतर दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अर्जाचा पहिला टप्पा भरता येणार आहे. याचे वेळापत्रक नंतर जाहीर होण्याची शक्यता आहे.

विद्यार्थी सरावाला कोरोनाचे सावट

कोरोनाचा फटका यंदा अकरावी प्रवेशप्रक्रियेवरही होणार आहे. यंदा अकरावी प्रवेशाचे तेरावे वर्ष आहे. गेल्या पाच वर्षांपासून प्रवेशातील होणारा गोंधळ कमी करण्यासाठी विद्यार्थी दहावीत असतानाच ऑनलाईन प्रवेशाची तयारी करून घेण्यात येते. दरवर्षी दहावीची परीक्षा संपली की तत्काळ प्रशिक्षण देण्यात येते. यंदा मात्र कोरोना असल्यामुळे विद्यार्थ्यांना सराव करताच आला नाही. दरवर्षी माध्यमिक शाळांत थेट ऑनलाईन प्रवेशाची माहिती पुस्तके आणि किट वितरीत करून विद्यार्थ्यांची पक्की तयारी करून घेण्यात येत होती. यंदा पुस्तके प्रिंटिंग होणार नाहीत तर विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर डाउनलोड करून घेता येणार आहेत.