Mon, Sep 16, 2019 11:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › काँग्रेसच्या महाराष्ट्रातील बारा उमेदवारांची आज घोषणा

काँग्रेसच्या महाराष्ट्रातील बारा उमेदवारांची आज घोषणा

Published On: Mar 11 2019 1:38PM | Last Updated: Mar 11 2019 1:43PM
मुंबई : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर उमेदवार अंतिम करण्याच्या हालचालींना काँगेसमध्ये वेग आला आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, मिलिंद देवरा, प्रिया दत्त आदी बारा उमेदवारांच्या नावांची घोषणा आज होण्याची शक्यता आहे.

मुंबई दक्षिण- मिलिंद देवरा, मुंबई उत्तर मध्य - प्रिया दत्त, मुंबई दक्षिण-मध्य - एकनाथ गायकवाड, नंदुरबार - के. सी. पाडवी, धुळे - रोहिदास पाटील, रामटेक - मुकुल वासनिक, हिंगोली - राजीव सातव, नांदेड - अमिता चव्हाण, सोलापूर - सुशीलकुमार शिंदे, गडचिरोली - डॉ. नामदेव उसेंडी, वर्धा - चारुलता टोकस, यवतमाळ - माणिकराव ठाकरे यांच्या उमेदवारीची घोषणा रात्री उशिरापर्यंत दिल्लीतून केली जाईल, अशी माहिती काँग्रेस सूत्रांनी दिली.