Mon, Jul 06, 2020 17:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात सेप्टिक टँकमध्ये तीन कामगारांचा मृत्यू   

ठाण्यात सेप्टिक टँकमध्ये तीन कामगारांचा मृत्यू   

Published On: May 11 2019 2:04AM | Last Updated: May 11 2019 1:33AM
ठाणे : प्रतिनिधी

येथील ढोकाळी नाकाच्या प्राईड प्रेसिडेन्सी लक्झेरिया इमारतीत सेप्टिक टँकमधील विषारी वायूची बाधा होऊन अमित पुहाल (20), अमन बादल (21), अजय बुमबक (24) या तीन कामगारांचा शुक्रवारी गुदमरून मृत्यू झाला.विरेंद्र  हटवाल (25), मंज्जित वैद्य (25), जसबीर पुहाल (24), रुमर पुहाल (30) आणि अजय पुहाल (21) या पाच जणांना वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या भाईंदरला राहणारे सर्व कामगार मूळचे हरयाणाचे आहेत. 

नेमके काय घडले?

वार्षिक डागडुजीचे काम प्राईड प्रेसिडेन्सी प्रशासनाने सेफट्रीट कन्सल्टंटला दिले होते. तर सेप्टिक टँक अर्थात मलनिःसारण केंद्राचे (एसटीपी प्लांट) सफाई काम खासगी ठेकेदार अजय बागुल याला दिले होते. गुरुवारी दुपारी आठ सफाई कामगार एसटीपी प्लांटमध्ये उतरले. मात्र 130 घनमीटरच्या या प्लांटची सफाई सायंकाळनंतरही अपुरी राहिल्याने रात्री जेवण करून पुन्हा आठ कामगार आतमध्ये उतरले आणि विषारी वायूची बाधा झाली. आत अडकलेल्या कामगारांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी पोहचल्या. त्यांनी रेस्क्यू ऑपरेशनही सुरु केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.