Wed, Jun 19, 2019 08:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात नवी मुंबईकर तिसरे ‘कार श्रीमंत’!

राज्यात नवी मुंबईकर तिसरे ‘कार श्रीमंत’!

Published On: Oct 12 2018 1:36AM | Last Updated: Oct 12 2018 1:31AMनवी मुंबई: प्रतिनिधी

महापालिकेने आयआयटीच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणात 67 टक्के नवी मुंबईकरांकडे चारचाकी तर 82 टक्के नागरिकांकडे दुचाकी वाहने असल्याचे आयआयटी अहवालात स्पष्ट करण्यात आले. ही आकडेवारी राज्यात तिसर्‍या क्रमांकाची आहे. विकास आराखडा (डीपी प्लॅन) आणि त्यानंतरचा विकास आराखडा नियंत्रण नियमावली (डीसी प्लॅन) बनवताना हा अहवाल विचारात घेतला जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्‍त एन. रामास्वामी यांनी दै. पुढारीशी बोलताना दिली.

ऐरोली, कोपरखैरणे, घणसोली, वाशी, बेलापूरमध्ये असलेल्या आयटी पार्कमुळे नवी मुंबईचा दर्जा वाढला असून चारचाकी वाहनांची खरेदीत वाढ झाल्याचे समोर आले आहे. राज्यात चारचाकी वाहनांमध्ये आता नवी मुंबईचा तिसरा क्रमांक लागतो. उच्च न्यायालयात दाखल असलेल्या पार्किंगच्या याचिकेसाठी या अहवालाची मदत होणार आहे. हा अहवाल न्यायालयात मांडण्यात येणार असून त्यानंतर विकास आराखडा (डीपी प्लॅन)  आणि त्यानंतरचा विकास आराखडा नियंत्रण नियमावली (डीसी प्लॅन) बनविताना हा अहवाल विचारात घेतला जाणार आहे. जेणेकरुन गावठाणामध्ये लहान जागेला बांधकामाची परवानगी देताना पार्किंग व्यवस्था, अतिक्रमण होऊ नयेत, यासाठी त्याची मदत होणार असल्याचे महापालिका आयुक्‍त एन. रामास्वामी यांनी सांगितले.

नवी मुंबईमध्ये असलेला अशिया खंडातील सर्वात मोठा औद्यागिक पट्टाएमआयडीसी पट्टा आणि गेल्या सात वर्षात वाढ झालेले आयटी क्षेत्रामुळे नोकरदारांनी चारचाकी (कार) वाहनाला पसंती दिली आहे. सर्वेक्षण करताना वन आरके ते बंगला असलेल्या घरात किती प्रकारची वाहने आहेत? त्याची आकडेवारी आयआयटीने आपल्या अहवालात दिल्याचे महापालिका आयुक्‍त एन रामास्वामी यांनी स्पष्ट केले. 

1 चारचाकी गाड्यांच्या संख्येत मुंबई, पुणे नंतर नवी मुंबई हे तिसर्‍या क्रमांकाचे शहर बनले आहे. या सर्वेमध्ये वाशी, घणसोली व ऐरोली मध्ये सर्वाधिक वाहन असल्याचे समोर आले आहे. आता या सर्वेक्षणानंतर शहरातील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी नवीन वाहतूक धोरण शहरात राबविण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्‍त एन. रामास्वामी यांनी सांगितले. 

2 नियोजनबद्ध आधुनिक शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या नवी मुंबईत वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेय. या आधुनिक शहरात वाहतुकीचे प्रश्‍न दिवसेंदिवस जटिल होत चालले आहेत. या वाहतूक समस्येचं योग्य नियोजन करता यावे, यासाठी नवी मुंबई महानगरपालिके तर्फे शहरात आयआयटी मार्फत सर्व्हे करण्यात आला.

नवी मुंबईकरांकडील वाहनांची आकडेवारी... 

67 टक्के नागरिकांकडे चारचाकी
82 टक्के  नागरिकांकडे दुचाकी
शहरात प्रत्येक घरामागे दीड कार
1 बीएचके घरांमध्ये : 33 टक्के कार
2 बीएचके घरांमध्ये : 70 टक्के कार
मल्टिी बीएचके घरे : 147 टक्के कार
सरासरी एक घरामागे दीड कार आहे