Fri, Jan 24, 2020 04:56
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महामार्गावरील खड्ड्याने घेतला दुचाकी स्वाराचा बळी 

महामार्गावरील खड्ड्याने घेतला दुचाकी स्वाराचा बळी 

Published On: Aug 22 2019 7:30PM | Last Updated: Aug 22 2019 7:16PM
पेण  : प्रतिनिधी 

मुंबई-गोवा महामार्गावरील खरपडा ते वडखळ दरम्यानचे  खड्डे आता जीवघेणे झाले आहेत. या खड्ड्यांमुळेच मुंबईहुन महाडकडे जाणाऱ्या दुचाकी स्वाराचा मृत्यू गुरुवार (ता.२२) सकाळी पेण तालुक्यांतील बळवली गावाजवळ घडला.

फिर्यादी अमन मिरकर रा. नवी मुंबई हे मयत अजीम मिरकर याच्यासोबत मोटारसायकल क्रं. एम.एच. 43 एई 9458  ही घेऊन महामार्गावरुन पनवेल ते महाड असे जात होते. बळवली गावाचे हद्दीतील मारुती मंदिरासमोर पडलेल्या खड्डयांमुळे मोटारसायकलवरील अजीम मिरकर हा रस्त्यावर खाली पडले. त्याचवेळी ठाण्यावरून अलिबागकडे जाणां-या एशियाड एसटी बस क्रं. एम.एच.07 - सी- 9182  या बसच्या मागच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. तर अमन मिरकर हे जख्मी झाले.

घटनास्थळी अपघातग्रस्तांचे मदतनीस कल्पेश ठाकूर व दादर सागरी पोलिस, वाहतूक पोलिस कर्मचारी पोहोचले. त्यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात हलविले. याप्रकरणी दादर सागरी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक फौजदार म्हाञे हे करीत आहेत.