Sun, Oct 20, 2019 00:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धारावीत 8 लाखांची संशयित रक्कम पकडली

धारावीत 8 लाखांची संशयित रक्कम पकडली

Last Updated: Oct 09 2019 7:01PM
मुंबई : प्रतिनिधी

मुंबई शहर जिल्ह्यात धारावी भागात आज (ता. 9) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास निवडणूक आयोगाच्या स्थिर तपासणी पथकाद्वारे 8 लाख 17 हजार रुपये इतकी संशयीत रक्कम पकडण्यात आली आहे.

आज सकाळी 10 वाजता सायन जंक्शन जवळ वाहन एमएच 04 एच एक्स 1916 पांढऱ्या रंगाची ह्युंडाई क्रेटा या वाहनाची तपासणी केली असता धीरेन कांतीलाल छेडा वय 42 राहणार घाटकोपर (पूर्व), मुंबई यांच्याकडे सदर वाहनात ही रक्कम आढळून आली.

याबाबत धारावी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस डायरी क्र. 21/2019, दिनांक 9/10/2019 अन्वये नोंद घेण्यात आली आहे. अशी माहिती 178-धारावी (अ.जा.) विधानसभा मतदार संघाचे  निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र हजारे यांनी दिली.