Fri, Jun 05, 2020 22:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महात्मा गांधींवर चौथी गोळी काँग्रेस कार्यकर्त्याने झाडली होती : हिंदू महासभा

महात्मा गांधींवर चौथी गोळी काँग्रेस कार्यकर्त्याने झाडली होती : हिंदू महासभा

Published On: May 16 2019 8:42PM | Last Updated: May 16 2019 8:42PM
कल्याण : प्रतिनिधी 

महात्मा गांधींवर झाडण्यात आलेल्या चौथ्या गोळीबद्दल सगळे शांत राहतात. परंतु चौथी गोळी झाडली गेली होती. याबाबत मला स्वतःला गोपाळराव गोडसे यांनी सांगितल होतं. त्याचे नाव सुद्धा मला माहित आहे. तो नागपूरचा काँग्रेसचा कार्यकर्ता होता, हे मी जाहीर करतो, असा गौप्यस्फोट हिंदू महासभेचे प्रवक्ता प्रमोद जोशी यांनी केला आहे.

तसेच भाजप नथुराम गोडसे याना राजकीय चलन म्हणून वापर करत आहे, असा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.