Sun, Apr 21, 2019 06:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › इतिहास पुन्हा जागा करण्याच काम किल्ला स्पर्धेने केले : श्रेयस जगताप

इतिहास पुन्हा जागा करण्याचं काम किल्ला स्पर्धेने केले : श्रेयस जगताप

Published On: Nov 09 2018 7:17PM | Last Updated: Nov 09 2018 7:13PMमहाड : प्रतिनिधी

साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यातील विविध भागांमध्ये उभारलेले किल्ल्यातून निर्माण केलेला जाज्वल्य इतिहास आज महाड तालुक्यातील किल्ले स्पर्धाच्या माध्यमातून पुन्हा जागा करण्याचा प्रयत्न महाड तालुका विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने करण्यात आल्याचे गौरवोद्गार युवा नेते श्रेयस जगताप यांनी स्पर्धेचा बक्षीस समारंभ कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्यक्त केले आहे. 

यावेळी श्रेयस जगताप यांनी छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना राज्यात शेकडो ठिकाणी किल्ल्यांची निर्मिती केली तसेच याचबरोबर स्वराज्य रक्षणा कामी त्यांनी दिलेली रणनीती युद्धनिति आज संपूर्ण जगा करता अभ्यासाचा विषय झाल्याचे सांगून त्यांनी दिलेला गनिमी कावा हा आजही कौतुकास्पद असल्याचे मानण्यात येते असे मत व्यक्त केले. 

महाड तालुक्यातून ज्या विविध स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला त्यांचे कौतुक करून यापुढील काळात अशाच प्रकारच्या अनेक स्पर्धांचे आयोजित करण्याचे सूचित करून युवकांसाठी अशा  स्पर्धा अत्यावश्यक असल्याचे मत व्य़क्त केले. या स्पर्धेचा प्रथम क्रमांक सूर्या सोसायटी तांबडभुवन यांनी निर्माण केलेल्या मुरुड जंजिरा किल्ल्यास देण्यात आला द्वितीय क्रमांक गवळ आऴी येथील युवकांनी साकारलेल्या कुलाबा किल्ल्यास तर तांबड भुवन येथील पिंपरी ग्रुपने निर्माण केलेल्या सिंहगड किल्यास तिसरा क्रमांक प्राप्त झाला. विजेत्या स्पर्धकांना प्रत्येकी 1500, 1000, 700 रुपयांच्या रोख पारितोषिकासह सन्मानचिन्हाने गौरविण्यात आले .