Tue, Nov 19, 2019 10:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रोहा येथील विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी (व्हिडिओ)

रोहा येथील विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी (व्हिडिओ)

Published On: Jul 12 2019 12:50PM | Last Updated: Jul 12 2019 12:59PM
रोहा : प्रतिनिधी

आषाढी एकादशीनिमित्ताने रोहा तालुक्यात विठ्ठल मंदिरात भक्तांनी तसेच वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली. यामुळे सकाळपासूनच मंदिर परिसरात उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले. 

रोहा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजवले असून धार्मिक व अध्यात्मिक वातावरणात मंदिरात आज सकाळपासूनच भाविकांची गर्दी झाली आहे. सकाळपासूनच भाविक विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेत होते. शहरासह ग्रामीण भागातिल भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी वारकऱ्याकडून टाळ, मृदंगांच्या निनादात ‘ग्यानबा तुकाराम’ आणि ‘माऊली-माऊली’चा जयघोष सुरू होता. 

तर, रोहा शहरासह तालुक्यात विविध धार्मिक कार्यक्रम, पंचक्रोशिची दिंडी आदी कार्यक्रम दिवसभर चालू आहेत.