Wed, Jun 19, 2019 09:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात महिला पोलीस उपनिरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न 

ठाण्यात महिला पोलीस उपनिरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न 

Published On: Aug 11 2018 1:40AM | Last Updated: Aug 11 2018 1:40AMठाणे : प्रतिनिधी 

पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी झालेल्या वादातून नैराश्य निर्माण झालेल्या कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक शारदा अंकुश देशमुख यांनी सकाळी राहत्या घरी फिनेल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

शारदा देशमुख या कापूरबावडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. एका गुन्ह्यातील तपासाबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर  यांच्याशी झालेला वाद त्यांनी मनाला लावून घेत शुक्रवारी घरातच फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांना तात्काळ वर्तकनगरच्या वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दरेकर यांची तडकाफडफी नियंत्रण कक्षात बदली करीत चौकशीचे आदेश  दिले. झोन पाचचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे स्वतः या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.