Wed, Apr 24, 2019 09:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे आयुक्तांच्या पत्नी-मुलीला झाला मुंबईत डेंग्यू

ठाणे आयुक्तांच्या पत्नी-मुलीला झाला मुंबईत डेंग्यू

Published On: Jul 13 2018 1:24AM | Last Updated: Jul 13 2018 1:24AMठाणे : प्रतिनिधी 

ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या पत्नी सिद्धी आणि मुलगी स्नेहा यांना  डेंग्यूची लागण झाल्याने त्यांना ठाण्याच्या ज्यूपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलांच्या शैक्षणिक प्रयोजनासाठी जयस्वाल यांचे कुटुंबीय सध्या बांद्रा येथे स्थलांतरित झाले असल्याने ठाण्यात त्यांना डेंग्यूची लागण झाली नसल्याचे पालिकेच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. 

हिरानंदानी इस्टेटमध्ये पालिका आयुक्तांचा बंगला असून हा बंगला सोडून  काही दिवसांपूर्वीच त्यांचे कुटुंबीय बांद्रा येथे राहायला गेले आहे. डेंग्यू झाल्याचे निदान होताच दोघींना 9 जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता दोघींचीही प्रकृती पूर्णपणे व्यवस्थित असून प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा होत असल्याचे संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे. शिक्षणासाठी माझे कुटुंबीय बांद्रा येथे राहत असून केवळ मी एकटा ठाण्यात राहत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.