Tue, Sep 17, 2019 19:44



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यातील पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी शाश्वत पुनर्वसन आराखडा : मुख्यमंत्री 

राज्यातील पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी शाश्वत पुनर्वसन आराखडा : मुख्यमंत्री 

Published On: Sep 12 2019 9:37PM | Last Updated: Sep 12 2019 11:51PM




मुंबई : प्रतिनिधी

जागतिक बँक आणि एडीबी (एशियन डेव्हलपमेंट बँक) यांच्या सहकार्यातून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरपरिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून शाश्वत पुनर्वसन आराखडा तयार करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. यातून पूरस्थिती उद्भवणाऱ्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळविण्यासाठीची योजनाही तयार करता येईल, त्यामुळे हा आराखडा इतरांसाठी 'रोल मॅाडेल' ठरेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची जागतिक आणि एडीबी बँकेच्या पथकाने नुकतीच पाहणी केली आहे. या पथकाची आज वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

यावेळी बैठकीस मुख्य सचिव अजोय मेहता, मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त तथा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचे विशेष पुनर्वसन अधिकारी प्रवीण परदेशी, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस चहल, ऊर्जा विभागाचे सचिव अरविंद सिंह, महावितरणचे संजीवकुमार, मदत व पुनर्वसनविभागाचे  सचिव किशोर राजे निबांळकर, आपत्ती नियंत्रण कक्षाचे संचालक अभय यावलकर संबंधित अधिकारी तसेच या दोन्ही बँकांच्या प्रतिनिधीमंडळातील सदस्य अनूप कारनाथ, दीपक सिंघ, सौरभ दानी, अशोक श्रीवास्तव, चंद्रशेखर सिंघ, सौरभ शाह आदी उपस्थित होते.