Sat, Jul 04, 2020 20:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे: खिडकलेश्वर तलावात माश्यांचा संशयास्पद मृत्यू

ठाणे: खिडकलेश्वर तलावात मृत माश्यांचा खच

Published On: Jun 13 2019 11:27AM | Last Updated: Jun 13 2019 11:27AM
नेवाळी : शुभम साळुंके

ठाणे महापालिका हद्दीतील कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात असलेल्या प्रसिद्ध अश्या खिडकलेश्वर मंदिरच्या आवरत असलेल्या तलावात मागील दोन दिवसांपासून मृत्यू होत आहे.सध्या तलावाच्या काठावर माश्यांचे खच पाहायला दिसून येत आहेत.

 महापालिका आपल्या हद्दीतील कोणत्याही तलावांची सुरक्षा नेहमी वाऱ्यावर सोडत असतात.त्याचा फटका कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील तलावात देखील पाहायला मिळाले आहे.मात्र आता कल्याण ग्रामीण भागात झालेल्या ह्या दुर्दैवी घटनेने परिसरातील गावांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.कल्याण ग्रामीण परिसरातील नागरिक आपल्या घरातील विविध प्रकारच्या विधी करण्यासाठी खिडकालेश्वर मंदिराच्या आवारात येत असतात. 

मात्र एवढे मासे कसे मृत्युमुखी पडले याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. झालेल्या घटनेनं परिसरात संताप व्यक्त केला जात असून सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.घडलेल्या प्रकारची स्थानिक नगरसेवक बाबाजी पाटील यांनी परिसराला भेट देऊन घडलेल्या प्रकारचे खापर ठाणे महापालिका प्रशासनावर फोडले असून अतिप्राचीन असलेल्या मंदिर

राच्या आवारात असलेल्या तलावाकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने असे प्रकार घडले असल्याचे पाटील यांनी संगीतले असून प्रकरणाची गंभीरपणे चौकशी करण्याची मागणी करणार असल्याने त्यांनी सांगितले आहे.