Sun, Jul 05, 2020 12:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भारतात मान्सूनचं आगमन; केरळ किनारपट्टीवर दिली धडक

भारतात मान्सूनचं आगमन; केरळ किनारपट्टीवर दिली धडक

Last Updated: Jun 01 2020 2:45PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

प्रदीर्घ कालावधीपासून प्रतीक्षेत असलेल्या मान्सूनचे देशात आगमन झाले आहे. आगमन होताच केरळमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात झाली आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी वातावरण अनुकूल असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. 

देशात ७५ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे रविवारी राज्यात वादळी पावसाने हजेरी लावली. समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत जाणार असल्याने कोकणसह राज्याच्या बहुतांश भागाला पुढील चार दिवस पूर्वमोसमी वादळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.