Sun, Oct 20, 2019 07:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात 6 जखमी 

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात 6 जखमी 

Published On: Jul 12 2019 8:41PM | Last Updated: Jul 12 2019 8:00PM
महाड : प्रतिनिधी 

मुंबई गोवा महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच असून आज (ता.12) दुपारी टोळ फाट्यानजीक होंडा सिटी व स्विफ्ट डिझायर य दोन कारमध्ये झालेल्या अपघातांमध्ये एकूण 6 जण जखमी झाले. यापैकी 3 जणांना अत्यवस्थ अवस्थेमध्ये मुंबई येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे. या गंभीर अपघातांमध्ये महाड येथील नामवंत उद्योजक सलाम ताज व त्यांचे बंधू इब्राहिम ताज यांचा समावेश आहे.

महाड तालुका पोलीस ठाणे व वाहतूक नियंत्रण कक्षातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार महाडच्या दिशेने येणाऱ्या होंडा सिटी क्रमांक (एमएच- o6-एस-1530) या गाडीला महाडकडून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या स्विफ्ट डिझायर क्रमांक (एमएच-04-ईएच-834) या गाडीची समोरासमोर ठोकर झाल्याने दोन्ही गाडीतील 6 प्रवासी जखमी झाले. यामधील स्विप्ट डिझायर गाडीतील चार प्रवाशांना माणगाव येथे तर होंडा सिटी गाडीतील दोन प्रवाशांना महाडमधील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

टोळ फाट्यानजीक झालेल्या याअपघातामध्ये महाड शहरातील नामवंत उद्योजक व सलाम ताज व त्यांचे  भाऊ इब्राहिम ताज याचा समावेश आहे. त्यांना गंभीर अवस्थेमध्ये  महाड येथील देशमुख नर्सिंग होम येथे प्राथमिक उपचार करुन त्यानंतर त्यांना मुंबई येथे हलविण्यात आल्याची माहिती रूग्णालयाच्या सूत्रांकडून देण्यात आली.

यासंदर्भात अपघातामधील दुसऱ्या गाडीत असलेल्या प्रवाशांची माहिती वाहतूक नियंत्रण शाखा, महाड तालुका, गोरेगाव पोलीस ठाणे तेथे संपर्क साधून विचारणा केली असता प्राप्त झाली नाही.

मुंबई गोवा महामार्गावरील अपघातात जखमी झालेल्या स्विफ्ट डिझायर गाडीतील प्रवाशांची नावे

अजित बबन पवार (वय 39,गुहागर)

सतीश राजाराम पवार (वय 49, संकलप)

विक्रम राजाराम पवार (वय 39,म्हसळा)

देवसन विक्रम पवार (वय 15, म्हसळा)