Wed, Jul 24, 2019 14:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला 

उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला 

Published On: Jun 16 2019 1:51AM | Last Updated: Jun 16 2019 1:51AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी

रविवारी होणार्‍या राज्यमंत्रिमंडळाच्या विस्तारात उपमुख्यमंत्रिपदावरुन शिवसेनेत निर्माण झालेली अस्वस्थता पाहता सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय टाळण्याचाच निर्णय घेतला असल्याचे खात्रीलायकरीत्या समजते.  

शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा सुरु झाल्यानंतर शिवसेनेत या पदासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चुरस लागली होती. उपमुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसादिवशी आमदारांना एकत्र करुन शक्तिप्रदर्शन केले होते. तर, संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून पुढे आणले.