Mon, Nov 20, 2017 17:24



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीच्या हायप्रोफाईल सोसायटीतील सेक्स रॅकेट उद्ध्वस्त

डोंबिवलीच्या हायप्रोफाईल सोसायटीतील सेक्स रॅकेट उद्ध्वस्त

Published On: Nov 14 2017 8:45PM | Last Updated: Nov 14 2017 8:49PM

बुकमार्क करा





डोंबिवली : वार्ताहर

डोंबिवली पूर्वेकडील हायप्रोफाईल सोसायटी समजल्या जाणाऱ्या एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा ह्युमन ट्रेकिंग फोर्सने भांडाफोड केला आहे. या सोसायटीत सोमवारी रात्री उशिरा केलेल्या छापेमारीमुळे परिसरातील रहिवाश्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.  

छापेमारी दरम्यान ठाणे ह्युमन ट्रेकिंग फोर्सने सेक्स रॅकेट चालवणाऱ्या सीमा तिवरेकर व रेश्मा बी या दोन महिला दलालांना अटक केली. यावेळी ३ पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे.
उपलब्ध माहितीनुसार डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर परिसरातील राघोबा इमारतीच्या पहिल्या मजल्यावर गेल्या दोन महिन्यांपासून या हायप्रोफाईल सोसायटीमध्ये अनैतिक देह व्यापाराचा व्यवसाय चोरी-छुपे सुरू होता. या प्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अटक महिलांना मंगळवारी कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील तपास पोलीस ठाण्याचे एपीआय सांळुके करीत आहेत.