Tue, Jun 18, 2019 12:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर सात दिवस ब्लॉक!

मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर सात दिवस ब्लॉक!

Published On: May 15 2019 2:08AM | Last Updated: May 15 2019 2:03AM
ठाणे : प्रतिनिधी 

मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर सात दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे. तळेगाव टोलनाका ते  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ला जोडणार्‍या मार्गिकेवरील धोकादायक  दरडींचे काम करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. धोकादायक दरडींचे काम करण्यासाठी 15 मे ते 17 मे आणि 21 मे ते 23 मे दरम्यान हा ब्लॉक  असेल.  

ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत  दरतासाला 15 मिनिटांकरता वाहतूक बंद करण्यात येणार आहे. यावेळी एकूण सहा ब्लॉक घेण्यात येणार असून प्रवाशांनी महामार्ग पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.