Sun, Oct 20, 2019 02:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे जिल्ह्यात ८३ लाख रुपये जप्त

ठाणे जिल्ह्यात ८३ लाख रुपये जप्त

Last Updated: Oct 10 2019 1:26AM
नवी मुंबई : राजेंद्र पाटील 

ठाणे जिल्ह्यांत गेल्या आठवड्याभरात निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत 83 लाख 83 हजार 550 रुपयांची रक्कम जप्त केली तसेच आचारसहिंतेचा भंग केल्याप्रकरणी मुंब्रा-कळवा मतदारसंघात 14, मिरा भाईंदर 03, ओवाळा-माजीवाडा 03 असे एकूण 20 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

विधानसभा निवडणुकीची आचारसहिंता लागू होताच ठाणे जिल्हा निवडणूक विभागाने भरारी, सुक्ष्म पथक, पोलीस पथके तैनात केली. या पथकांनी आचारसहिंतेचा भंग केल्याप्रकरणी सर्वाधिक गुन्हे मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघात नोंदवले. 26 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत ही कारवाई करण्यात आली.

महामार्गावर या पथकांची नियुक्ती केली आहे. ही पथके संशयित वाहनांची तपासणी करत आहेत.  एखाद्या वाहनात असलेल्या व्यक्तींकडे रक्कम आढळली आणि त्यांनी सक्षम पुरावे सादर केल्यानंतर ते समाधानकारक वाटल्यास निवडणुक निर्णय अधिकारी त्याबाबत निर्णय घेतील अशी माहिती निवडणूक विभागाने दिली. 

जिल्ह्याभरात अशी 100 हुन अधिक पथके तैनात आहेत. ही पथके ठाणे-नाशिक महामार्ग, कल्याण-भिवंडी बायपास, ऐरोली-मुलुंड मार्ग, ठाणे-बेलापूर,सायन-पनवेल मार्ग, वाशी-कोपरखैरणे मार्ग,  शिळफाटा-कल्याण-कंलबोली-तुर्भे मार्ग, कल्याण-बापगाव मार्ग, कल्याण-कोनगाव मार्ग अशा ठिकाणी तैनात केले आहेत.