Fri, Jan 24, 2020 04:54
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'राज' की बात, भाजपला कमल हसन यांची 'हबकी' 

'राज' की बात, भाजपला कमल हसन यांची 'हबकी' 

Published On: Mar 04 2018 4:02PM | Last Updated: Mar 04 2018 3:58PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

देशातील सर्व राज्यात पक्षाची व्याप्ती वाढवण्यासाठी मोर्चे बांधणी करणाऱ्या भाजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा व्यंगचित्राच्या माध्यमातून फटकारे मारले आहेत. तामिळनाडूमधील राजकारणात भाजपच्या वाढत्या हस्तक्षेपावर भाष्य करणारे व्यंगचित्र राज ठाकरे यांनी रेखाटले आहे. 

तामिळनाडूच्या राजकारणात अभिनेते कमल हसन आणि रजनीकांत यांच्या प्रवेशामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची चर्चा जोर धरत आहे. याच पार्श्वभूमीवर कमल हसन यांच्या प्रवेशानंतर भाजपची चिंता वाढणार असल्याचे मत राज यांनी व्यंगचित्रातून व्यक्त केले. भाजपच्या गोटातील चिंता दाखवण्यासाठी राज यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कमल हसन यांचे व्यंगचित्र रेखाटले आहे. एका तळ्यात फुललेल्या कमळात त्यांनी कमल हसन उभे असल्याचे दाखवले आहे. 

'साहेब हे अचानक कुठून उगवले आता?' असा प्रश्न अमित शहा गंभीर अवर्भावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारताना दाखवण्यात आले आहे. तामिळनाडूत कोणते 'कमल' उमलले, टोला लगावत राज यांनी तामिळनाडूतील राजकारणाच्या पार्श्वभूमीवर भाजपवर फटकारे लगावले आहेत.