Wed, Jun 19, 2019 08:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › इंधन दरवाढीची मालिका सुरूच; पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ 

इंधन दरवाढीची मालिका सुरूच; पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ 

Published On: Oct 12 2018 8:16AM | Last Updated: Oct 12 2018 8:16AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

गेल्‍या दीड महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज वाढ होत आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. गेल्या आठवड्यात केलेल्या दर कपातीनंतर इंधनाच्या दरात रोजच वाढ होताना दिसत आहे. या दरवाढीमुळे पेट्रोल पुन्हा नव्वदी गाठण्याची शक्‍यता आहे. 

मुंबईत आज (१२ ऑक्टोबर) पेट्रोल १२ पैसे तर डिझेल २९ पैशांनी महागले. त्यामुळे मुंबईत आज पेट्रोलचा दर प्रति लिटर ८७.९४ रुपये आणि डिझेलचा दर प्रति लिटर ७८.५१ रुपये झाला आहे तर, दिल्लीत पेट्रोल १२ पैसे तर डिझेल २८ पैशांनी महाग झाले आहे. आज दिल्लीमध्ये पेट्रोलसाठी एक लिटरमागे ८२.४८ रुपये तर डिझेलसाठी प्रति लिटर ७४.९० रुपये मोजावे लागणार आहेत. 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढत चालल्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे. इंधन दवाढीसह आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठेत डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचीही मोठी घसरण झाली झाली आहे.