Sat, Sep 21, 2019 05:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याणामधील 'त्‍या' हायस्कूलच्या फीवाढ विरोधात पालकांचे आंदोलन 

कल्याणामधील 'त्‍या' हायस्कूलच्या फीवाढ विरोधात पालकांचे आंदोलन 

Published On: Jun 13 2019 5:42PM | Last Updated: Jun 13 2019 5:42PM
कल्याण : प्रतिनिधी

कल्याण पूर्वेतील सेंट मेरी हायस्कूल शाळा प्रशासनाने यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या फीमध्ये अचानक पंधरा टक्क्यांनी वाढ केली आहे. या बेसुमार फी वाढ विरोधात विद्यार्थ्यांच्या पालकांनी पहिल्‍याच दिवशी सकाळी सहा वाजल्‍यापासून शाळेच्या प्रवेशव्दारावर आंदोलन केले.

पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी मध्यस्थी करीत शाळा प्रशासन, स्थानिक नगरसेवक महेश गायकवाड व पालक संघटनेचे शिष्ठमंडळ आदींची आपल्या दालनात बैठक घेऊन आवाजवी फी दरवाढ कमी करण्यासाठी प्रयत्न केले. या वेळी पालकांच्या शिष्ठमंडळाने शाळा प्रशासनानाने फी दर वाढ कमी करण्या बाबत लेखी स्वरूपात मागणी केली असता, शाळा प्रशासनानाने कोणताच प्रतिसाद न दिल्याने बैठकीची बोलणी फिस्कटल्याने अखेरीस पालकांनी फी दरवाढीचे आंदोलन तसेच सुरु ठेवले आहे.