Thu, Dec 13, 2018 02:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दादर फुल मार्केटमध्ये गोळी झाडून एकाची हत्‍या(व्हिडिओ)

दादर फुल मार्केटमध्ये गोळी झाडून एकाची हत्‍या(व्हिडिओ)

Published On: Oct 12 2018 12:58PM | Last Updated: Oct 12 2018 2:56PMठाणे : प्रतिनिधी

दादरच्‍या फुल मार्केटमध्ये गोळी झाडून एकाची हत्‍या करण्यात आली आहे. मनोज मौर्या (वय, ३५)असे हत्‍या झालेल्‍या व्यक्‍तीचे नाव आहे. दादार पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, पोलिस मारेकऱ्याचा शोध घेत आहेत.  

दादर येथील प्रमोद महाजन गार्डन जवळ सेनापती बापट मार्गावर शुक्रवारी सकाळी ७ वाजता अज्ञाताने मनोज याच्यावर पाठीमागून गोळी झाडली. यात त्‍याचा जागीच मृत्‍यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्‍थळी पोहचले मात्र, तोपर्यंत मारेकरी पळून गेला. याबाबत दादर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्‍तीविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस या हत्‍येचा अधिक तपास करत आहेत.