Sat, Jul 04, 2020 18:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोकण किनारपट्टीवर एकही बोट मासेमारीसाठी नाही

कोकण किनारपट्टीवर एकही बोट मासेमारीसाठी नाही

Last Updated: Jun 03 2020 3:48PM
नवी मुंबई : पुढारी वृतसेवा 

कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळाचा तडका बसण्याची शक्यता लक्षात घेऊन मेरीटाईम बोर्डाकडून सर्व मासेमारीसाठी जाणा-या नौकांवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे रायगडसह मुंबई आणि नवी मुंबईतून आज बुधवारी एकही बोट बाहेर निघाली नसल्याची माहिती मेरीटाईम बोर्डाचे अध्यक्ष एन. रामास्वामी यांनी दिली.     

कुलाबा मुंबई येथील काही फिशिंग बोटी ससून डॉक येथे आतमध्ये सुरक्षित ठेवलेल्या आहेत. तसेच गेटवे बंदर येथे एकही प्रवासी बोट नाही. तसेच सर्व प्रवासी बोटी दारूखाना मुंबई येथे अगोदरच नेण्यात आल्याचे मेरीटाईम बोर्डाचे अध्यक्ष एन. रामास्वामी यांनी स्पष्ट केले आहे.

रेवस मधील कोणतीही मासेमारी बोट मासेमारीसाठी गेलेली नाही. तसेच एक मासेमारी नौका खाडीत नांगर टाकून ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे. सदर नौकेच्या मालकाची माहिती घेण्यात येत आहे. आय. व्ही. नौका कोविड १९ मुळे यापूर्वीच बंद करण्यात आल्या आहेत. तसेच नवी  मुंबईतून एकही बोट मासेमारीसाठी बाहेर निघाली नसल्याची माहिती मेरीटाईम बोर्डाचे अध्यक्ष एन. रामास्वामी यांनी दिली.