Wed, Jun 03, 2020 00:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एनईएफटीवरील शुल्क जानेवारीपासून हटणार

एनईएफटीवरील शुल्क जानेवारीपासून हटणार

Last Updated: Nov 09 2019 10:03PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्स्फर (एनईएफटी) सुविधेवर जानेवारी 2020 पासून शुल्क न आकारण्याची सूचना बँकांना केली आहे.

बँकांकडून एनईएफटी व्यवहारांवर जीएसटीखेरीज शुल्क आकारले जाते. जानेवारीपासून ऑनलाईन अथवा ऑफलाईन एनईएफटी सेवेवर शुल्क न आकारण्याची सूचना बँकांना देण्यात आली आहे. आरबीआयने यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट सिस्टीम अर्थात आरटीजीएसवरील व्यवहारांवरीलही शुल्क हटविण्याचा निर्णय आरबीआयने याआधी घेतला आहे. 

ऑनलाईन व्यवहारांना चालना देण्यासाठी आरबीआयकडून हे निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या दोन्ही सेवांवरील शुल्क हटविल्यानंतर आरबीआय समिती नियुक्‍ती करणार आहे. ही समिती जलद प्रतिसादाची माहिती घेणार आहे. ऑनलाईन व्यवहारांत वाढ होत असल्याने ग्राहकांना लाभ देण्याचे निर्देश बँकांना देण्यात आल्याचे आरबीआयच्या परिपत्रकात म्हटले आहे.