Wed, Jul 24, 2019 13:58



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शरद पोंक्षेकडून नथुराम गोडसेचे समर्थन

शरद पोंक्षेकडून नथुराम गोडसेचे समर्थन

Published On: May 15 2019 12:52PM | Last Updated: May 15 2019 12:56PM




मुंबई : पुढारी ऑनलाईन

ऐन निवडणुकीमध्ये दिग्गज अभिनेते कमल हसन यांनी एका सभेदरम्यान स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता आणि त्याचे नाव नथुराम गोडसे होते, असे वक्तव्य केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात निवडणुकीच्या चर्चेमध्येच नव्या मुद्द्याला तोंड फुटले. या पार्श्वभूमीवर अभिनेते शरद पोंक्षे यांनी फेसबुवर पोस्ट करत कमल हसन यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

"दहशतवादाला धर्म नसतो". अगदीच मान्य, पण पकडलेला दहशतवादी हा मुस्लिम असतो हे जगातील वास्तव. हिंदू धर्म हा मुळातच सहिष्णूवादी. इतिहास साक्ष आहे की हिंदूनी कधीही दहशतवादी कारवाया केल्या नाहीत. आक्रमणे केली नाहीत. आम्ही प्रत्येक मुसलमानाकडे दहशतवादी म्हणून बघतच नाही. म्हणूनच जगात मुसलमान सर्वात सुरक्षित व सुखी कूठे रहात असतील तर ते हिन्दूस्थानात आणि हे कित्येक मुसलमानांच मत आहे. पण तरीही एक अभिनेता केवळ राजकीय स्वार्थासाठी हिंदू दहशतवादी असा ऊल्लेख करतोय तेही जाहीरपणे. आणि आपण ते खपवून घेतो. हाच हिंदूंचा सहिष्णूपणा.  असे मत पोंक्षे यांनी फेसबुद्वारे मांडत ते पुढे म्हणाले आहेत की, 

आता नथूराम गोडसे ह्याने गांधीचा खून केला. ह्यावर चूक बरोबर ह्यावर लाखो मत मांडली गेली. चर्चा झाल्या. पण म्हणून सरसकट हिंदूनाच दहशतवादी ठरवल जातय. हे वक्तव्य करणाऱ्या  कमल हसन यांचा मी तीव्र निषेध करतो. आपल्याला पटल तर तूम्ही ही करा. असा जनतेला संदेश देत.  हा कोणा पक्षाचा अपमान नाही. हा बहुसंख्य हिंदूंचा अपमान आहे. ता.क. तथाकथित पुरोगामी नीही निषेध करायला हरकत नाही. 

तसचे एका मराठी वृत्तवाहिनला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ‘नथुराम गोडसे हे नाटक काँग्रेस सत्तेत असताना आलं. भाजपा आणि शिवसेनेची सत्ता असताना नाटकावर बंदी आणली होती. मग आता असं म्हणायचं का की काँग्रेसने नथुराम गोडसेला पाठिंबा दिला?’ ‘दहशतवाद ही संकल्पनाच वेगळी असून एखाद्याची विचारसरणी न पटल्याने त्याचा खून करणे ही गोष्ट वेगळी आहे. एखाद्याचा खून केल्यानं कुणी दहशतवादी होत नाही,’ असंदेखील यावेळी पोंक्षे म्हणाले.