Mon, Dec 09, 2019 05:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे मनपात कोल्हापूर पॅटर्न; महापौरपदी शिवसेनेचे नरेश म्‍हस्‍के!

ठाणे मनपात कोल्हापूर पॅटर्न; महापौरपदी शिवसेनेचे नरेश म्‍हस्‍के!

Last Updated: Nov 21 2019 2:26PM
ठाणे : प्रतिनिधी

कोल्हापूर महापालिकेत झालेला शिवसेना काँग्रेस आघाडी पॅटर्न ठाणे महापालिकेत देखील पाहायला मिळाला. अपेक्षेप्रमाणेच महापौरपदी शिवसेनेचे नरेश म्हस्के तर उपमहापौरपदी पल्लवी कदम यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी पालिकेमध्ये जाऊन नवनियुक्त महापौर शिवसेनेचे म्हस्के यांचा सत्कार केला.

ठाणे महापालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ही बिनविरोध निवड झाली. यावेळी संपूर्ण महापालिका मुख्यालयात तसेच बाहेरील परिसरात मोठ्या प्रमाणात फुलांची सजावट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी पालिका मुख्यालयाच्या बाहेर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.