Sat, Aug 24, 2019 09:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बेरोजगारीच्या विरोधात राष्ट्रवादीचे ठाण्यात आंदोलन 

बेरोजगारीच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन 

Published On: Feb 11 2019 2:24PM | Last Updated: Feb 11 2019 2:24PM
ठाणे : प्रतिनिधी 

सत्तेवर येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक वर्षी दोन कोटी बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याची घोषणा केली होती. मात्र रोजगार देणे बाजूलाच राहिले. आतापर्यंत ६.६० कोटी तरुण बेरोजगार झाले असून मोदींना जागे करण्यासाठी ठाण्यात राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. शेकडो तरुणांनी रोजगार मिळावा, यासाठी आज ठाण्यातील दमाणी इस्टेट पोस्ट ऑफिस कार्यालयात आपला बायोडेटा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्पीड पोस्टच्या माध्यमातून पाठवला आहे. गेल्या पाच वर्षात नोकरीसाठी एकही कॉल आला नसल्याचे या तरुणांचे म्हणणे आहे . 

आमदार जितेंद्र आव्हाड, शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये मोदींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तरुणांना रोजगार मिळाला नाही तर देशात उद्रेक होईल आणि याला मोदी जबाबदार असतील, अशी टीका यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.