Tue, Sep 17, 2019 03:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्रालयासमोर राष्‍ट्रवादीचे भोपळा फोडो आंदोलन 

मंत्रालयासमोर राष्‍ट्रवादीचे भोपळा फोडो आंदोलन 

Published On: May 21 2018 1:01PM | Last Updated: May 21 2018 1:01PMमुंबई : प्रतिनिधी

राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर नोकरी भरतीची घोषणा केली पण, ती घोषणा निव्वळ फसवणूक असल्‍याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने भोपळा फोडो आंदोलन केले. राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांनी यावेळी मंत्रालयाच्या दारात भोपळे फोडले.

परिस्‍थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. राज्‍यात फडणवीस सरकार नाही तर, फसवणीस सरकार आहे, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला. 


 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex