होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाला तीन वर्षे कारावास

लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाला तीन वर्षे कारावास

Published On: Jan 13 2018 1:13AM | Last Updated: Jan 13 2018 1:12AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

गुन्ह्यामध्ये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करत लोकन्यायालयात ही केस चालवून ती संपविण्यासाठी आणि गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी 3 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीन वर्षापूर्वी अटक केलेल्या आरोपी पोलीस उपनिरीक्षक सुनिल भाट याला शुक्रवारी विशेष सत्र न्यायालयाने तीन वर्षे कारावास आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर या गुन्ह्यातील एका खासगी व्यक्तीची न्यायालयाने पुराव्यांअभावी सुटका केली आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार यांच्या मुलाविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करुन लोकन्यायालयात ही केस चालवून ती संपविण्यासाठी आणि गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी लाचखोर भाट याने 5 हजार रुपयांची मागणी केली होती. पैशांची मागणी होताच तक्रारदार यांनी एसीबीचे मुख्यालय गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरुन एसीबीच्या पथकाने तपास करत 5 जुलेै 2014 रोजी आझाद मैदान पोलीस ठाण्यात सापळा रचून तडजोडीअंती 3 हजार रुपये स्विकारताना लाचखोर भाट याच्यासह दलाल अतिमुल्ला शेख याला अटक केली होती.