Thu, Apr 19, 2018 17:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आरटीई नर्सरी पहिलीचे  प्रवेश 24 जानेवारीपासून!

आरटीई नर्सरी पहिलीचे  प्रवेश 24 जानेवारीपासून!

Published On: Jan 13 2018 7:38AM | Last Updated: Jan 13 2018 1:59AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळांमध्ये राखीव असलेल्या 25 टक्के कोटा प्रवेशाची प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 23 जानेवारी पर्यंत शाळांची नोंदणी होणार असून 24 जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरू होणार आहे.  बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार कायद्यानुसार (आरटीई) वंचित  व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. 2018-19 या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून पालकांना अर्ज ऑनलाइन भरावा लागणार आहे. जून पासून सुरु होणार्‍या प्रवेशप्रक्रियेतंर्गत नर्सरी किंवा पहिलीच्या प्रवेशासाठी पालकांनी 24 जानेवारीपासून ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. 26 एप्रिलपर्यंत प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न शालेय शिक्षण विभागाचा आहे. प्रवेश प्रक्रियेत यंदा पालकांना सहा लॉटरीतून संधी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.