होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ग्रामसडक योजनेचे रस्ते 2019 पूर्वी पूर्ण करा; मुख्यमंत्री

‘ग्रामसडक योजनेचे रस्ते 2019 पूर्वी पूर्ण करा’

Published On: Apr 16 2018 4:01PM | Last Updated: Apr 16 2018 4:03PM



मुंबई : प्रतिनिधी

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून राज्यात 30 हजार कि.मी.लांबीच्या रस्त्यांचे जाळे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ते डिसेंबर 2019 पूर्वी पूर्ण करावे. हायब्रिड अॅन्युईटी रस्त्यांच्या कामांसाठी तातडीने कार्यारंभ आदेश देऊन पावसाळ्यापूर्वी कामे सुरू करावीत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

हायब्रिड अॅन्युईटी रस्त्यांच्या कामांचा आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रालयात घेतला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या.

हायब्रिड अॅन्युईटी अंतर्गत 195 रस्त्यांचे काम हाती घेण्यात येणार असून नागपूर विभागात 33 कामांच्या माध्यमातून 1358 कि.मी.लांबीचे रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. अमरावती विभागात 32 कामांच्या माध्यमातून 1527 कि.मी.लांबीचे रस्त्यांचे काम केले जाणार आहे. औरंगाबाद विभागात 32 कामांच्या माध्यमातून 1920 कि.मी., नाशिक विभागात 31 कामांच्या माध्यमातून 1257 कि.मी, पुणे विभागात 25 कामांच्या माध्यमातून 1775 किं.मी., मुंबई विभागात 42 कामांच्या माध्यमातून 1402 कि.मी. असे एकूण 195 कामांच्या माध्यमातून 9238 कि.मी. लांबीचे रस्ते केले जाणार आहे. मार्च 2018 मध्ये नव्याने 21 कामांना मंजुरी देण्यात आली असून त्या माध्यमातून 1001 कि.मी. लांबीचे रस्ते तयार होणार आहेत. या कामांसाठी 44 निविदा मंजुर करण्यात आले असून त्याचे कार्यारंभ आदेश तातडीने द्यावेत व पावसाळ्यापूर्वी कामे सुरु करावीत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, या योजने अंतर्गत 30 हजार कि.मी. लांबीच्या रस्त्यांने उद्दिष्ट असून 14 हजार 844 कि.मी. लांबीच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापूर्वी 4452 कि.मी. लांबींच्या रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहेत. 6756 कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे काम पूढील महिन्यात सुरु होणार असून उर्वरित रस्त्यांच्या कामांना सप्टेंबर पर्यंत कार्यारंभ आदेश देऊन ऑक्टोबर पासून कामांना सुरुवात करावी. ग्रामीण महाराष्ट्रात विकासाला गती देण्यासाठी हे रस्ते महत्वाची भूमिका बजावणार असून डिसेंबर 2019 पूर्वी सर्व कामे पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

शासकीय इमारतीत 8.55 लक्ष युनिट वीजेची बचत

शासकीय इमारती उर्जा कार्यक्षम प्रकल्प राबविण्यात येत असून नागपूर येथील विधानभवन, राजभवन, आमदार निवास, रवी भवन, हैद्राबाद हाऊस, पुणे येथील राजभवन, सेट्रल बिल्डींग, औंध येथील जिल्हा रुग्णालय, सोलापूर जिल्हा रुग्णालय, मुंबई मुलुंड येथील राज्य कामगार विमा रुग्णालय, बांधकाम भवन, जीटी रुग्णालय, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आणि औरंगाबाद उच्च न्यायालय या इमारती या प्रकल्पांतर्गत पूर्ण झाल्या आहेत. या प्रकल्पामुळे 8.55 लक्ष युनिट वीजेची बचत होत असून त्यामुळे 98 लाख रुपयांची बचत झाली आहे. या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत 2 लाख 11 हजार 615 ट्युब लाईट, 71 हजार  327 पंखे, 1 हजार 670 वातानुकुलीत यंत्रे बदण्यात आली आहेत. दिवसाला साधारणत: 5 लाख 65 हजार रुपयांची बचत होत असल्याचे सादरीकरणादरम्यान सांगण्यात आले.

Tags : Mukhya Mantri Gram Sadak Yojana, Work,2019,CM,PWD