Mon, Dec 09, 2019 18:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पावसानं बी ध्‍यानात ठेवलंय, कधी बरसायचं ते!

पावसानं बी ध्‍यानात ठेवलंय, कधी बरसायचं ते!

Published On: Jun 20 2019 12:57PM | Last Updated: Jun 20 2019 1:03PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

जून महिना संपण्‍याच्‍या मार्गावर आहे. मात्र पावसाचा पत्ताच नाही. पावसाच्‍या मनात काय आहे हे कुणालच ठावूक नाही. सर्वजण पावसाच्‍या प्रतीक्षेत आहेत. पावसानं मात्र ध्‍यानात ठेवलंय कधी बरसायचं ते. मान्‍सून कधी येणार याबद्दल माहिती हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून दिली आहे. यामध्‍ये त्‍यांनी म्‍हटले आहे की, रत्नागिरी, कोल्हापूर या ठिकाणी पावसाचे आगमन झाले आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रात पाऊस पडण्यास सुरूवात होईल. कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची एंट्री झाली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

पाऊस मागच्‍या काही दिवसांपासून हुलकावणी देत आहे. मात्र येत्‍या दोन ते तीन दिवसांमध्‍ये मान्सून दाखल होणार आहे याची माहिती माहिती हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून दिली आहे. 

हवामान विभागाच्‍या अधिकारी के. एस. होसाळीकर यांच्‍याकडून मिळालेल्‍या माहितीनुसार पावसाचे अगमन लवकरच होईल. यामुळे बळीराजाला दिलासा मिळून तो सुखावून जाईल हेही तेवढेच खरे आहे.