Wed, Jun 19, 2019 09:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › संघाच्या शस्त्रपूजेवर बंदी घाला : आंबेडकर

संघाच्या शस्त्रपूजेवर बंदी घाला : आंबेडकर

Published On: Oct 12 2018 1:36AM | Last Updated: Oct 12 2018 1:34AMमुंबई : प्रतिनिधी 

विजयादशमीच्यादिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने शस्त्रपूजन केले जाते. या पूजेदरम्यान पारंपारिक शस्त्रासोबत अत्याधुनिक शस्त्रांचादेखील समावेश असतो. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या शस्त्रपूजेवर बंदी घालावी, अशी मागणी भारिप नेते प्रकाश आंबेडकर केली आहे. 

आरएसएसच्या विजयादशमीच्या शस्रपूजेवर बंदीच्या मागणीसाठी भारिपच्यावतीने मुंबई महापालिका मुख्यालयासमोरील फिरोज शहा पुतळ्याजवळ पुकारण्यात आले. लोकशाही असलेल्या देशात एखाद्या संघटनेला अशा शस्त्रपूजेची गरज काय, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. देशात एक सेना असताना दुसर्‍या सेनेची गरजच काय असा प्रश्‍नही यावेळी त्यांनी विचारला. सध्याचे सरकार हे ऑक्सिजनवर आहे. प्रस्थापित सरकारने वंचित घटकांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित ठेवले आहेत. सनातनच्या अनेक कार्यकर्त्यांकडे शस्रसाठा सापडत असताना सरकार मात्र सनातनला पाठीशी घालत असल्याचे आंबेडकर म्हणाले. बहुजनांचे प्रश्‍न जर सुटणार नसतील तर आमचा पवित्रा वेगळा असेल असा इशाराही द्यायला ते विसरले नाहीत. 

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मुख्यालयाबाहेर तगडा बंदोबस्त ठेवला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाबाहेर फिरोजशहा यांच्या पुतळ्याजवळ पुकारण्यात आलेल्या या आंदोलनात सुमारे 300 कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलकांनी यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.